Ad will apear here
Next
डॉ. समीर दातार लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘नमन तुला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

डॉ. समीरदातार लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘नमन तुला’ या पुस्तकाचे प्रकाशनतसेच त्याचे ई-बुक व ऑडीयो बुक चे अनावरण २६ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. नीतू मांडकेआय.एम.ए. हाऊस येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या सेंट विन्सेंट हायस्कूलमधीलमराठी विभागाच्या माजी प्रमुख स्मिता करमरकर होत्या, तर अध्यक्ष होते ज्येष्ठरंगकर्मी, लेखक, समीक्षक माधव वझे. ह्या कार्यक्रमास बुकगंगा.कॉम च्या संचालिकागौरी जोशी, अंजली दीक्षित, रत्नावली दातार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचेसूत्रसंचालन अमित दातार यांनी केले आणि डॉ. समीर दातार यांनी आभार मानले.


'नमन तुला' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डावीकडून डॉ. समीर दातार, डॉ. भालचंद्र दीक्षित, स्मिता करमरकर, माधव वझे, अंजली दीक्षित, रत्नावली दातार, गौरी जोशी, डॉ. भक्ती दातार

 

नेत्रतज्ञडॉ. समीर दातार यांनी सुंदर कवितांची रचना केली अन् दंततज्ञ असलेल्या त्यांच्यापत्नी डॉ. भक्ती दातार यांनी त्या कवितांना स्वरसाज चढवला. या कार्यक्रमातदोघांनीही काव्यगायन करून उपस्थितांची दाद मिळविली.


डॉ. भक्ती दातार आणि डॉ. समीर दातार

 

या पुस्तकात काही पराक्रमी व अलौकिक कीर्तीच्या व्यक्तींवरसाकारलेली ही गीतचरित्रे वाचनीय आहेत. यामध्ये संत एकनाथ, समर्थ रामदास, बाजीप्रभू देशपांडे,थोरले बाजीराव, राणी लक्ष्मीबाई, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, रमाबाई रानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे, बाबा आमटे आणि भारतीय जवानयांवर अतिशय सुंदर शब्दांत काव्यात्मक वर्णन केले आहे. ह्या व्यक्तींची सर्वपरिचित वैशिष्ठ्ये आणि त्यांचे काही गुणविशेष या गीतचरित्र मालेत गुंफलेले आहेत.तसेच या पुस्तकात ह्या सर्व थोर व्यक्तींची रेखाचित्रे काढली आहेत. कमीत कमीरेषांमध्ये काढलेली ही व्यक्तिचित्रेही अतिशय सुबक अशी आहेत. प्रिंट पुस्तक आणिई-बुकसोबत याचे श्राव्य पुस्तकही (ऑडीयो बुक) तयार केले आहे. तेही श्रवणीय झालेआहे.

 

प्रिंट पुस्तक किंवा ई-बुक वाचताना व त्याचे ऑडीयो बुक ऐकतानाआपणास वाचन आणि श्रवण ह्या दोहोंचा आनंद घेता येईल.

 

बुकगंगा.कॉम वरून नमन तुलाचे प्रिंटपुस्तक, ई-बुक आणि ऑडीयो बुक विकत घेण्यासाठी खाली डीटेल्स दिलेले आहेत-


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZPUDF
Similar Posts
डॉ. समीर दातार लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘नमन तुला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नेत्रतज्ञ डॉ. समीर दातार यांनी सुंदर कवितांची रचना केली अन् दंततज्ञ असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. भक्ति दातार यांनी त्या कवितांना स्वरसाज चढवला.
डॉ. भक्ती दातार यांनी समजायला सोप्या अशा भाषेत तयार केलेले 'से चीज' ऑडीओ बुक आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव म्हणजे ‘दात’ आणि याविषयीची ही ऑडीओ बुक स्वरूपातली माहिती सर्व वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरेल.
डॉ. भक्ती दातार यांनी समजायला सोप्या अशा भाषेत तयार केलेले 'से चीज' ऑडीओ बुक आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव म्हणजे ‘दात’ आणि याविषयीची ही ऑडीओ बुक स्वरूपातली माहिती सर्व वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरेल.
'बुकगंगा पब्लिकेशन्स'चे नवे पुस्तक - मेग मेहेन लिखित काव्यसंग्रह 'अल्लखचिन्हे'... मेगमेहेन यांच्या या कवितांमधून मीलनातील अनुभूती, त्यातील तृप्ती व तीमधून वाट्यास येणारी पुनर्मिलनाची अनिवार आस अशा सौंदर्यवादी भाववृत्तींचा प्रभावी आविष्कार झाला आहे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language